Ad will apear here
Next
सूर्यदत्ता ठरला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’
‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अॅवाॅर्ड २०१९’मध्ये अभिनेत्री पूनम धिल्लन यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना सुषमा चोरडिया व नयना गोडांबे.

पुणे : माय ब्रँड बेटर आयोजित ‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अॅवॉर्ड्स २०१९’मध्ये सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट’ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी हा सन्मान स्वीकारला. या वेळी नयना गोडांबे उपस्थित होत्या.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या प्रगतीचा आलेख गेल्या २० वर्षांत कायमच चढता राहिला आहे. विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल येथे अंमलात आणले जात असून, वैश्विक दृष्टीकोनातून शिक्षण दिले जात आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राधान्य देऊन त्यांना घडविण्यात ‘सूर्यदत्ता’चा पुढाकार आहे. या सगळ्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

एकूण ५० संस्थांचा यामध्ये गौरव करण्यात आला. यासाठी तीन महिन्यांहून अधिक काळ उत्कृष्ट संस्था निवडीची प्रक्रिया सुरु होती. नामांकन, संशोधन, सर्वेक्षण, वेबसाईट विविध पैलूंवर परीक्षण करीत मान्यवर परीक्षकांनी ही निवड केली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZSTCG
Similar Posts
‘सूर्यदत्ता’च्या सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अॅचिव्हर’ पुरस्कार पुणे : शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘एशिया-अरब समिट अँड अॅवाॅर्ड्स’मध्ये ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अचिव्हर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच संस्थेच्या तीन इन्स्टिट्यूट्सना सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला
मीमांसा प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी प्राज आणि ‘आयआयएसईआर’चा करार पुणे : गेल्या १२ वर्षांपासून ‘आयआयएसईआर’तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या मीमांसा या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या विस्तारासाठी यंदा प्राज इंडस्ट्रीज आणि ‘आयआयएसईआर यांनी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार प्राज या स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांसाठी तांत्रिक, तसेच आर्थिक सहाय्य देईल.
भारतीय संगीतातली मूलभूत अंगे वास्तुरचनेशीही निगडित : पं. सुरेश तळवलकर पुणे : ‘भारतीय कला तसेच संगीतातली शास्त्र, तंत्र, विद्या आणि कलाही अंग वास्तुरचनाशास्त्रामध्येही (आर्किटेक्चर) येतात. यात अमूर्ताकडून मूर्ताकडे होत जाणारा भारतीय बंदिशीतला प्रवास वास्तुरचनाशास्त्राशी जवळीक साधणारा आहे. त्यातील आकृतीबंध हा रागाचे मापदंड आणि आकारमानाशी संबंधित असून, संगीताची निर्मिती ही
नवले महाविद्यालयात संविधान दिन साजरा कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language